ऑनलाइनमुळे भाडेकरूंच्या माहितीची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

पुणे - भाडेकरूंची माहिती देण्यासंदर्भात पोलिसांनी सुरू केलेल्या ‘टेनंट इन्फॉर्मेशन फॉर्म’ या ऑनलाइन पद्धतीमुळे गैरसोय होत आहे. या पद्धतीविषयी पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याचा दावा ‘असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्‌स’ या संघटनेने केला आहे. 

संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंगवी आणि पदाधिकाऱ्यांनी या पद्धतीमधील अडचणींची माहिती निवेदनाद्वारे पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांना दिली. ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जाची पोच ई- मेल आयडीवर कळवावी किंवा पूर्वीप्रमाणे भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात स्वीकारावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. 

वाढलेल्या बाजारभावांमुळे अनेक जण स्वतःचे घर घेण्यापेक्षा भाडेतत्त्वावर घर घेतात. भाडेतत्त्वावर घर घेणाऱ्यांची माहिती पोलिसांना कळविणे बंधनकारक केले आहे. ही माहिती ऑनलाइन पद्धतीने देण्याची सुविधा पुणे पोलिसांनी नुकतीच सुरू केली आहे. ‘टेनंट इन्फॉर्मेशन फॉर्म’ असे या सुविधेचे नाव आहे. या पद्धतीत अर्ज दाखल केल्यानंतर एक ‘टीन नंबर’ जनरेट होतो. या नंबरचे काय करायचे आणि पोचपावती मिळविण्यासाठी काय करावे याची माहिती मिळत नाही. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस दलाच्या विशेष शाखेकडे विचारणा केली. त्यांना मिळालेल्या उत्तरामुळे आणखी संभ्रम निर्माण झाल्याचे शिंगवी यांनी निवेदनात नमूद केले आहे.

पोलिसही अनभिज्ञ
टीन नंबर घेऊन संबंधित पोलिस ठाण्यात गेल्यानंतर पोलिस ठाण्यात फॉर्मची प्रिंट काढली जाते. त्यावर भाडेकरू आणि घरमालकाचे फोटो चिकटविले जातात आणि ओळखपत्राचा पुरावा घेतला जातो. याबाबत काही पोलिस ठाण्यांत योग्य पद्धतीने माहिती दिली जात नाही. पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना या पद्धतीविषयी पूर्ण माहिती नसल्याचे आढळून आल्याचे शिंगवी यांनी म्हटले आहे. 

Web Title: pune news tenant online information