‘थर्टी फर्स्ट’ समुद्र किनारी

‘थर्टी फर्स्ट’ समुद्र किनारी

पुणे - नाताळ सण, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांसह राज्यातील पर्यटक किनारपट्टीला अधिक पसंती देत आहेत. गणपतीपुळे, तारकर्ली, अलिबाग, देवगड या किनारपट्टी परिसरातील असलेले हॉटेलचे दीड-दोन महिन्यांपूर्वीच ‘बुकिंग फुल’ झाले आहेत. यातून वर्षाच्या अखेरीस पर्यटनासाठी कोकण किनारपट्टी ‘हॉट स्पॉट’ ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

डिसेंबर महिना म्हटलं की पर्यटकांसाठी पर्वणीचाच असतो. नाताळ सण, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत, हा योग साधण्यासाठी  पर्यटकांनी सुट्यांचे काही महिन्यांपूर्वीच नियोजन केले आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच डिसेंबर महिन्यात पर्यटनाचा बेत आखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड आणि वेंगुर्ले समुद्र किनारपट्टी, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीलगत असणाऱ्या हॉटेलचे बुकिंग दोन ते तीन महिने आधीच फुल झाल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक वैशाली चव्हाण यांनी सांगितले.

कोकण किनारपट्टीपाठोपाठ पर्यटक महाबळेश्‍वर, माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यालाही प्राधान्य देत आहेत. या दोन्ही ठिकाणांच्या हॉटेलचे बुकिंगही काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. तसेच काही पर्यटक नवीन ठिकाणी जाण्याचे नियोजन करत आहेत.

स्थानिक पर्यटनाचाही ट्रेंड
स्थानिक पर्यटनालाही सध्या वाढती मागणी आहे. शहरापासून २० ते ४० किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर असलेली पर्यटनस्थळेही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ‘छोटा ब्रेक’ म्हणून शहराच्या जवळपास वीकेंड प्लॅन होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पानशेत, मुळशी, मावळ, गडकिल्ले, असे पर्याय निवडले जात आहेत. कुटुंबीयांसमवेत किंवा मित्र-मैत्रिणींसमवेत जाण्यासाठी अशा वेगळ्या पर्यटनस्थळांना भेट देण्याचे नियोजन होत आहे. काही व्यावसायिकांकडून ‘थर्टी फर्स्ट पार्टी’चा बेत आखत धरण, तलाव परिसरांसाठी टूर पॅकेजच्या ऑफर दिल्या जात आहेत. या दिवसांत ‘नाइट ट्रेक’, ‘वन डे ट्रेक’ अशा पर्यटनाच्या पॅकेजलाही अधिक मागणी आहे. विशेषकरून कात्रज-सिंहगड, तोरणा, रायगड, राजगड या किल्ल्यांवरील ट्रेकिंगला पसंती दिली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com