स्वच्छतागृहात महिलांना मिळणार "सॅनिटरी नॅपकिन' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे - महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगारातील महिलांच्या स्वच्छतागृहात लवकरच "सॅनिटरी नॅपकिन'ची सोय उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. याबाबतचा प्रस्ताव मुंबई येथील महामंडळाच्या मुख्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. 

या सुविधेसाठी ठराविक रक्कम आकारण्यात येणार आहे. प्रस्तावास मान्यता मिळताच तातडीने या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे; तसेच या नॅपकीनची विल्हेवाटदेखील याच ठिकाणी लावण्यात येणार आहे. स्वारगेट येथे स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यास मिळणारा प्रतिसाद पाहून त्याची व्याप्ती वाढविण्यात येईल, अशी माहिती विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली. 

दरम्यान, वाकड-हिंजवडी परिसरातून गेल्या महिन्यापासून दर शुक्रवारी मुंबईसाठी दहा जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. प्रवाशांकडून त्यास पसंतीही मिळत आहे. या भागातून शुक्रवारी दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत मुंबईला जाणाऱ्या-येणाऱ्यांची प्रवाशांची संख्या मोठी असते. मात्र प्रवाशांच्या तुलनेत बस उपलब्ध नसल्याने, त्याच्या फायदा खासगी वाहतूकदारांकडून घेतला जातो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले. 

Web Title: pune news toilet women Sanitary napkins