Pune Traffic Signal | पुणेकरांनो सावधान! आता सिग्नलवर जास्त वेळ थांबण्याची तयारी ठेवा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

signal
पुणेकरांनो सावधान! आता सिग्नलवर जास्त वेळ थांबण्याची तयारी ठेवा...

पुणेकरांनो सावधान! आता सिग्नलवर जास्त वेळ थांबण्याची तयारी ठेवा...

पुणे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सध्या पुणेकर हैराण झाले आहेत. ऑफिस, शाळा सुटण्याच्या वेळी तर हमखास वाहतूक कोंडी होते. अनेकदा वाहतूक कोंडीतच लोकांना तासतासभर अडकून पडावं लागतं. यावर उपाय शोधण्यासाठी सध्या पुणे शहर वाहतूक शाखा प्रयत्न करत आहे. (Pune Traffic Jam)

वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पुणे वाहतूक पोलिस विभागाकडून आता आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत आहेत. शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी लवकरच ट्रॅफिक सिग्नल सुरू आणि बंद करण्याचा कालावधी वाढवण्यात येणार आहे. पुणे (Pune News) शहरात आजमितीस २६७ ट्रॅफिक सिग्नल कार्यन्वित आहेत.

शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणचे सिग्नल ९० ते १२० सेकंद आहेत. गरजेनुसार याची वेळ १५० ते १८० सेकंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे यांनी दिली. शहरातील आता वर्दळीच्या चौकातील सिग्नलला चालकांना आता थोडा जास्त वेळ काढावा लागणार आहे. ज्या ठिकाणी गरज आणि आवश्यकता आहे, त्याच ठिकाणी हा उपाय केला जाणार आहे. मेट्रो प्रकल्प, पावसामुळे पडलेले खड्डे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्कींग यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे

Web Title: Pune News Traffic Signal Duration Will Be Increased From Now

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune traffic police