Pune News : आदिवासी युवकाला सापडली लखनौच्या मुलीची विसरलेली पर्स

चहा विक्रेत्याचा प्रामाणिकपणामुळे सर्व स्तरातून होतेय कौतुक .
Pune News
Pune NewsSakal

जुन्नर - आदिवासी भागातील श्री क्षेत्र कुकडेश्वर येथे लखनौच्या विद्यार्थीनीची डेबिट कार्डसह महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स चहा स्टॉलवर (बुधवार ता.०६) विसरली ही पर्स स्टॉल धारक आदिवासी युवकाने (गुरुवार ता.०७) रोजी परत करून प्रामाणिकपणाचा परिचय दिला आहे.

मंगेश मेमाणे असे चहा स्टॉल चालविणाऱ्या युवकाचे नाव असून डेबिटकार्डसह महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स परत मिळाल्यानंतर रूपाली सिंग हिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.एकीकडे माणुसकी हरवत चालली असून चोरी सारख्या घटना घडत असताना जुन्नरच्या दुर्गम आदिवासी भागातील मेमाणे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Pune News
Solapur BJP: रणजितसिंह निंबाळकरांचा माढ्यावर पुन्हा नेम; भाजपातच उमेदवारीसाठी रस्सीखेच

जुन्नर येथील आर्यन गायकवाड हा पुण्यातील डेक्कन कॉलेज ऑफ आर्कियालोजी येथे शिक्षण घेत असून जुन्नर परिसराचा अभ्यास करण्यासाठी त्याच्यासोबत शिक्षण घेत असलेले नऊ विद्यार्थी आले होते. अंबा-अंबिका लेणी, किल्ले शिवनेरी नंतर श्री क्षेत्र कुकडेश्वर येथे भेट देऊन नाणेघाटातील शिलालेखाचा अभ्यास करून संध्याकाळी ते जुन्नरला आले.

Pune News
Pune News : प्लॉट, प्लिंथ सोसायट्यांचा पुनर्विकास शक्य

उत्तरप्रदेशच्या लखनौ येथील रुपाली सिंग ही विद्यार्थिनी त्यांचे सोबत होती. कुकडेश्वर येथे आपली पर्स विसरली असल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने आर्यन व त्याचे काकांना याविषयी सांगितले. त्यांनी कुकडेश्वरचे पोलीस पाटील तानाजी दिवटे यांना सांगून पर्स शोधण्यात मदत करण्यास सांगितले.

Pune News
Nagpur News : आरोपीला पोलिस ठाण्यात व्हीआयपी सेवा, बालिकेचे ४ वर्षांपासून करीत होता शोषण

दरम्यान ह्या विद्यार्थ्यांनी चहा घेतला त्या स्टॉलवर रूपाली हिने चहाचे बिल फोन पे केले होते.मंगेश मेमाणे यांनी पे.टी.एम. नंबर वरून रूपालीशी संपर्क साधून पर्सविषयी सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी दिपू गवारी यांनी अमोल गायकवाड यांच्याकडे पर्स सुपूर्द केली यावेळी पोलीस कर्मचारी संतोष पठारे यांच्या हस्ते आज सकाळी ता.०७ तोजी ही पर्स रूपालीकडे सुपूर्द केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com