वाघोलीमध्ये ट्रक उलटल्याने चार तास वाहतूककोंडी

निलेश कांकरिया
सोमवार, 15 जानेवारी 2018

वाघोली (पुणे): पुण्यातील मार्केटयार्डकडे डाळ घेऊन जाणारा ट्रक वाघोलीतील वाघेश्वर चौकात उलटल्याने पुणे-नगर महामार्गावर चार तास वाहतूककेांडी झाली. ट्रक हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. ट्रकने सिग्नलच्या खांबाला धडक दिल्याने तो खांब जमीनदेास्त झाला. ट्रक व सिग्नलचे नुकसान वगळता कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

आज (सोमवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकचा रॉड तुटल्याने तो उलटा झाला. चौकातील सिग्नलचा खांब मात्र यामध्ये जमीनदोस्त झाला. डाळीच्या गोण्याने ट्रक भरलेला होता. यामध्ये चालक व अन्य एक जण होता. मात्र, दोघेही किरकेाळ जखमी झाले.

बिलासपूर येथून माल घेऊन पुण्यातील मार्कटयार्ड येथे तो जात होता. ट्रक महामार्गाच्या मधोमध उलटल्याने एक वाहन जाईल एवढीच जागा दोन्ही बाजूने शिल्लक हेाती. यामुळे सकाळी सात वाजल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंत प्रचंड वाहतूककोंडी झाली. सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे नोकरदार, विद्यार्थी यांचे प्रचंड हाल झाले. अकरा वाजल्यानंतर हा ट्रक तेथून हटविल्यानंतर वाहतूक सुरळित झाली. या दरम्यान नागरीक व पोलिसांनी वाहतुकीवर नियंत्रण ठेवले. चालक व त्याच्या साथीदाराचे नाव कळू शकले नाही.

Web Title: pune news truck accident four hours traffic jam in Wagholi