मालधक्‍का चौकाजवळ भरधाव मोटारीचा थरार; दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

पुणे - चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात गॅरेजमधील कामगारासह दोघांचा मृत्यू झाला. भरधाव मोटारीने गॅरेजसमोर मोटारीच्या दुरुस्तीचे काम करताना सहा वाहनांना उडवले. 

त्यात दोन्ही मोटारींमध्ये अडकल्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर अन्य एका व्यक्‍तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी मालधक्‍का चौकातील आंबेडकर भवनापासून काही अंतरावर झाला. 

अरुण शिवाजी गायकवाड (वय ५७, रा. वल्लभनगर, पिंपरी) आणि फ्रॅंक अलेक्‍झेंडर डिक (वय ५८, रा. न्यू मोदी खाना, भवानी पेठ) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मोटारचालकाला अटक केली आहे. राजेंद्र वसंत लोडगे (वय ४५, रा. नसरापूर) असे संशयिताचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर भवन येथून के. ई. एम. रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटार गॅरेज आहे. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास फ्रॅंक हा गॅरेजसमोर मोटारीच्या दुरुस्तीचे काम करत होता, तर गायकवाड हे पिंपरी येथून त्यांची मोटार दुरुस्तीसाठी घेऊन आले होते. त्यामुळे ते तेथे उभे होते. त्या वेळी चालक राजेंद्र हा त्याची आई आजारी असल्यामुळे त्यांना घेऊन भरधाव सेव्हन लव्हज चौकातून ससून रुग्णालयाच्या दिशेने जात होता. त्या वेळी त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. गॅरेजसमोरील चार मोटारींसह दोन दुचाकींना धडक देत तो काही अंतरावर गेला.

Web Title: pune news two death in accident