स्वाइन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

पुणे - शहरात स्वाइन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या आजाराने 62 रुग्ण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

पुणे - शहरात स्वाइन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या आजाराने 62 रुग्ण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

लोहगाव आणि करमाळा (जि. सोलापूर) येथील रुग्णांचा स्वाइन फ्लूवर पुण्यातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पावसाळी वातावरणामुळे स्वाइन फ्लूच्या "एच1एन1' विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

स्वाइन फ्लू झालेल्या सात रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, तर तीन रुग्णांना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल केले आहे. 1 जानेवारीपासून आतापर्यंत शहरातील 314 जणांना स्वाइन फ्लू झाला आहे. लवकर निदान, योग्य उपचार आणि नियमित औषधोपचार यामुळे स्वाइन फ्लू पूर्ण बरा होतो. आतापर्यंत 243 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: pune news two death by swine flu