Pune News : कोंढव्यात सराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्तूल जप्त

कोंढव्यातील खडी मशिन चौकाजवळ एकजण थांबलेला असून, त्याच्याकडे पिस्तूल आहे,
Crime
Crimesakal

पुणे - कोंढवा पोलिसांनी खडी मशिन चौक परिसरातून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

तुळशीराम शहाजी उघडे (वय २५, रा. टिळेकरनगर, कोंढवा, मूळ रा. कर्जत, जि.अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

कोंढव्यातील खडी मशिन चौकाजवळ एकजण थांबलेला असून, त्याच्याकडे पिस्तूल आहे, अशी माहिती पोलिस कर्मचारी विशाल मेमाणे यांना मिळाली. त्यावरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक संजय मोगले आणि संदीप भोसले यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक दिनेश पाटील, विशाल मेमाणे, सतीश चव्हाण, नीलेश देसाई, लवेश शिंदे, जोतिबा पवार यांच्या पथकाने सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता दोन पिस्तुलासह चार काडतुसे आढळली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com