"यूजीसी नेट' परीक्षा आता तीनशे गुणांची 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पुणे - सहायक प्राध्यापक पदासाठी होणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) आता नव्या नियमांसह 8 जुलै रोजी 

पुणे - सहायक प्राध्यापक पदासाठी होणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) आता नव्या नियमांसह 8 जुलै रोजी 

होणार आहे. ही परीक्षा आता 300 गुणांची असेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (सीबीएसई) परीक्षा पद्धतीत बदल केले आहेत. "ज्युनिअर रिसर्च फेलोशिप'साठी वयाची अट 28 ऐवजी 30 वर्षांपर्यंत वाढविली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यास सहा मार्चपासून सुरवात होईल. त्यासाठी अंतिम मुदतही पाच एप्रिल असेल. ही परीक्षा पूर्वी 350 गुणांची होती. आता तीनशे गुणांची आणि तीनऐवजी दोन पेपर असतील. पहिला पेपर 50 प्रश्‍न आणि दुसरा पेपर 100 प्रश्‍न प्रत्येकी 2 गुण अशी 300 गुणांची परीक्षा होईल. परीक्षेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. पहिल्या पेपरसाठी एक तासाचा अवधी असणार आहे; तर दुसऱ्यासाठी दोन तास वेळ असेल. याबाबतचे संक्षिप्त परिपत्रक "सीबीएसई'ने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्याची अधिकृत घोषणा http://cbsenet.nic.in या वेबसाइटवर एक फेब्रुवारीला होईल, असे या मंडळाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे. 

परीक्षेचे बदललेले स्वरूप 
पेपर एक (प्रश्‍न : 50), गुण : 100. 
वेळ : सकाळी 9.30 ते 10.30. 
अभ्यासक्रम पूर्वीच्या पहिल्या पेपरनुसारच असणार आहे. सर्व विषयांसाठी पहिला पेपर एकच असेल. सर्व प्रश्‍न अनिवार्य असणार आहेत. 

पेपर दोन (प्रश्‍न : 100), गुण : 200. 
वेळ : सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत. 
विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडलेल्या विषयानुसार असेल. सर्व प्रश्‍न अनिवार्य असणार आहेत.

Web Title: pune news UGC NET exam