महाराष्ट्रात मराठी भाषेचे विद्यापीठ हवेच - लक्ष्मीकांत देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

पुणे - 'मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी, तिचा सार्वत्रिक वापर होण्यासाठी महाराष्ट्रात मराठी भाषेचे विद्यापीठ असायलाच हवे. ती काळाची गरज आहे,'' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

सकाळ प्रकाशन आणि पुणे मराठी ग्रंथालय यांच्या वतीने आयोजित समारंभात ज्येष्ठ समीक्षक द. ता. भोसले यांच्या "लोपलेल्या सुवर्णमुद्रा' या पुस्तकाच्या तिसऱ्या भागाचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, "सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले, पुणे मराठी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष दिलीप ठकार उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, 'कन्नड, तमीळ या भाषांची विद्यापीठे आहेत. त्या धर्तीवर मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन व्हायला हवे. त्यातून म्हणी, शब्दकोशाचे व्यापक काम व्हायला हवे. एखाद्या विद्यापीठाने किंवा सरकारच्या भाषा विभागाने जे कार्य करायला हवे ते एकट्या द. ता. भोसले यांनी केले आहे. ते "लोपलेल्या सुवर्णमुद्रा'मधून अनुभवायला मिळत आहे.''

भोसले म्हणाले, 'शहाण्या माणसांसाठी म्हणी आवश्‍यक आहेत. यातून समाजजीवनाचे दर्शन घडते. जगणे सुंदर आणि संस्कारित करण्यासाठी, भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपण म्हणींचा अधिकाधिक वापर करायला हवा. त्यांचा अभ्यास करायला हवा.'' अनुजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: pune news university of Marathi language in Maharashtra