शास्त्रीय संगीत, नाटक, फ्यूजन, सौभद्रचाही स्वराविष्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

पुणे - प्रख्यात तबलावादक पं. कुमार बोस आणि अनिंदो चटर्जी यांची तबल्याची जुगलबंदी... गायक राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन... वैभवशाली प्राचीन संगीत नाटकांच्या परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या ‘संगीत सौभद्र’ नाटकाचा प्रयोग... लुई बॅंक्‍स-निर्वाणा यांच्या बॅंडचे फ्यूजन... तरुणाईचा आवडता सतारवादक निलाद्री कुमार यांचे वैशिष्ट्यपूर्ण सतारवादन श्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे, यंदाच्या ‘वसंतोत्सवा’त.

पुणे - प्रख्यात तबलावादक पं. कुमार बोस आणि अनिंदो चटर्जी यांची तबल्याची जुगलबंदी... गायक राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन... वैभवशाली प्राचीन संगीत नाटकांच्या परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या ‘संगीत सौभद्र’ नाटकाचा प्रयोग... लुई बॅंक्‍स-निर्वाणा यांच्या बॅंडचे फ्यूजन... तरुणाईचा आवडता सतारवादक निलाद्री कुमार यांचे वैशिष्ट्यपूर्ण सतारवादन श्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे, यंदाच्या ‘वसंतोत्सवा’त.

नव्या वर्षाची सुरवात झाली की श्रोत्यांना वेध लागतात, ते ‘वसंतोत्सवा’चे. ‘सकाळ’ची प्रस्तुती असलेला यंदाचा हा महोत्सव १९ ते २१ जानेवारी दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे रंगणार आहे. ख्यातनाम गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त ‘मराठे ज्वेलर्स’ आणि ‘रावेतकर ग्रुप’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्वरयात्रेत तीनही दिवस वैविध्यपूर्ण स्वराविष्काराची अनुभूती घेण्याची संधी श्रोत्यांना मिळाली आहे. महोत्सवाचे हे अकरावे वर्ष आहे. विशेष म्हणजे, यंदाही सर्व श्रोत्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र प्रवेशिका घेणे आवश्‍यक आहे.

डॉ. पटवर्धन, बक्षी, घोरपडे यांचा सन्मान
संगीतक्षेत्रात विद्यादान करणारे गुरुजन, संशोधन- लेखन करणारे कलावंत आणि उदयोन्मुख कलाकार यांना ‘वसंतोत्सव पुरस्कारा’ने सन्मानित केले जाते. यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गानगुरू डॉ. सुधा पटवर्धन, बंदिशकार- गायक पं. विजय बक्षी, युवा गायक ईश्‍वर घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. ‘वसंतोत्सवा’च्या शेवटच्या दिवशी (ता. २१) या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

पहिला दिवस 
कुमार बोस आणि अनिंदो चटर्जी यांची तबल्याची जुगलबंदी, राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन

दुसरा दिवस 
‘संगीत सौभद्र’ नाटकाचा प्रयोग

तिसरा दिवस
लुई बॅंक्‍स-निर्वाणा या बॅंडचे फ्यूजन, निलाद्री कुमार यांचे सतारवादन. सोबत तबलावादक विजय घाटे

महोत्सवाच्या मोफत प्रवेशिका मंगळवारपासून (ता. १६) सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळात मिळतील.
प्रवेशिका खुर्ची आणि भारतीय बैठक अशा दोन प्रकारांत आहेत. खुर्चीच्या प्रवेशिका केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी वितरित केल्या जाणार असून, प्रत्येकी दोन प्रवेशिका मिळतील. प्रवेशिका शिल्लक असेपर्यंत त्याचे वाटप सुरू राहील.
प्रवेशिका असतील त्यांनाच महोत्सवासाठी प्रवेश मिळेल.

येथे मिळतील प्रवेशिका...
१. ‘सकाळ’चे शिवाजीनगर कार्यालय, २७ नरवीर तानाजीवाडी (०२०-२५६०२१००)
२. पुणे सिटी हॅशटॅग शॉप्स्‌
    बाय मोअर रिटेल, पत्र्या मारुती चौक, नारायण पेठ (९८२२४२२५९२) 
     भैरवनाथ एंटरप्रायझेस, रवी टेरेस, भारती विद्यापीठ, आंबेगाव बु. (९७६७३७२६००)
 अनुज फॅशन, पूना बेकरी शेजारी, सिंहगड रस्ता (९०११३०९७९२)
     कानिफनाथ टेक्‍स्टाइल, उरुळी देवाची फाटा, पुणे-सासवड रस्ता, फुरसुंगी (९०११६५७३९३)
     गजानन एंटरप्रायझेस, शॉप क्र. १, विजय सेल्स समोर, पौड रस्ता (८४५१०९०१६१) 
     अभिजित टेक्‍स्टाइल, आकाशवाणीसमोर, सोलापूर रस्ता, हडपसर (७०२८०२१२२४)
     गुरुकृपा असोसिएट्‌स मिलेनियम, पु. ना. गाडगीळजवळ, चापेकर चौक, चिंचवड (८४८४०७७७७७)
     परफेक्‍ट फॅशन, ग्रीन व्हॅली, कस्पटे वस्ती, वाकड (९९२१२७०५८५)
३.    लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या पुढील शाखा
    गुरुगणेशनगर, ऋग्वेद हॉटेलजवळ, श्रेयस अपार्टमेंट्‌स, कोथरूड (०२०-२५३८९५२७)
    सहकारनगर, अजय अपार्टमेंट्‌स, तावरे कॉलनी, सहकारनगर (०२०-२४२३११००)
     नारायण पेठ, केसरी वाडा, न. चिं. केळकर रस्ता (०२०-२४४५२५३६)
     सेनापती बापट रस्ता, रत्ना मेमोरियल हॉस्पिटल शेजारी (०२०-२५६८३०००).

Web Title: pune news vasantotsav