व्हाइस ऍडमिरल आर. बी. पंडित "आयएनए'चे नवे कमांडंट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

पुणे - मूळचे पुण्याचे असलेले व्हाइस ऍडमिरल आर. बी. पंडित यांनी केरळ राज्यातील एडिमला येथील "इंडियन नेव्हल ऍकॅडमी'चे मावळते कमांडंट एस. व्ही. भोकरे यांच्याकडून कमांडंट पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल आणि नेव्ही मेडल या पदकांनी भूषविण्यात आले आहे. 

पुणे - मूळचे पुण्याचे असलेले व्हाइस ऍडमिरल आर. बी. पंडित यांनी केरळ राज्यातील एडिमला येथील "इंडियन नेव्हल ऍकॅडमी'चे मावळते कमांडंट एस. व्ही. भोकरे यांच्याकडून कमांडंट पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल आणि नेव्ही मेडल या पदकांनी भूषविण्यात आले आहे. 

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी. टी. पंडित यांचे ते पुत्र आहेत. व्हाइस ऍडमिरल पंडित हे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी छात्र आहेत. तसेच, "डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन, द कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेयर मुंबई आणि द रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज लंडन'चे देखील माजी छात्र आहेत. पाणबुडी विरोधी युद्धतंत्रामध्ये ते पारंगत आहेत. त्यांनी "आयएनएस निर्घात, आयएनएस विंध्यगिरी, आयएनएस जलश्‍व' आणि 22व्या "मिसाईल व्हेसेल स्क्वाड्रन' मुंबईचे नेतृत्व केले आहे. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात नौदल सल्लागार, तसेच "इंटिलिजेंट हेडक्वार्टर' येथे नौदलाच्या दक्षिण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांना एडिमला येथील "आयएनए'च्या कमांडंट पदावर पदोन्नती देण्यात आली. 

व्हाइस ऍडमिरल एस. व्ही. भोकरे यांनी 20 मे 2016 मध्ये कमांडंट पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी आपल्या 15 महिन्यांच्या कार्यकाळात "आयएनए'मध्ये पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण सुविधांमध्ये उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. पारंपरिक "पुलिंग आउट'द्वारे त्यांना निरोप देण्यात आला. 

""माझा मुलगा "इंडियन नेव्हल ऍकॅडमी'चा कमांडंट झाला, याचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान आहे. मी स्वतः लेफ्टनंट जनरल होतो, माझा मुलगाही "थ्री स्टार ऑफिसर' झाला, याचा विशेष आनंद आहे. तो शब्दांत व्यक्त करू शकत नाही.'' 
 लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी. टी. पंडित 

Web Title: pune news Vice Admiral R. B. Pandit INA new commandant