तंदुरुस्तीसाठी कुलगुरू दीड तास पळतात!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

पुणे - ‘‘कुलगुरू पदामुळे माझ्याभोवती सतत ताणतणावाचे वातावरण असते. पुढचे पाच वर्षे असे वातावरण असणार आहे; पण त्यावर मात करण्याचे बळ व्यायामामुळे मिळते,’’ असे ‘गुपित’ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी उलगडले. दररोज पहाटे साडेचार वाजता उठतो. दीड तास पळतो. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्याचे रहस्य सांगितले.

महाराष्ट्रीय मंडळाचा ‘कॅ. शिवरामपंत दामले स्मृती पुरस्कार’ बॅडमिंटन खेळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रशिक्षक उदय पवार यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे सरकार्यवाह धनंजय दामले यांच्या ‘राहा निरोगी’ या पुस्तकाचे डॉ. करमळकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. संस्थेचे अध्यक्ष भूषण गोखले उपस्थित होते.

करमळकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात अधिकाधिक खेळाडू निर्माण व्हावेत. त्यांनी खेळातून महाराष्ट्राचे नाव जगाच्या पातळीवर पोचवावे.’’ 

टिळक म्हणाल्या, ‘‘राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे चांगले खेळाडू पुण्यात घडायला हवेत. त्यासाठी त्यांना चांगले प्रशिक्षक मिळायला हवेत. सध्या अनेक खेळाडूंना चांगल्या प्रशिक्षकाची गरज आहे. ती पूर्ण झाली तरच क्रीडा क्षेत्र वृद्धिंगत होईल.’’ आपली मुले स्पर्धा परीक्षांमध्ये चमकावीत म्हणून पूर्वीचे पालक धडपड करायचे; पण आताच्या पालकांना आपली मुले खेळातही चमकावीत असे वाटते. हे कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.

आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे बॅडमिंटन खेळू शकलो. अनेक मुलांना घडवू शकलो. आजवरच्या या ‘स्पोर्ट करिअर’मध्ये आई-वडिलांचाच मोलाचा वाटा आहे; पण या क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन कुठलाही अर्ज न करता हा पुरस्कार मिळाला, याचा आनंद आहे. पालकांनी आपल्या मुलांमधील कलागुण लक्षात घेऊन त्यांना पाठिंबा द्यावा. 
- उदय पवार, बॅडमिंटन प्रशिक्षक

Web Title: pune news vice chancellor running for fitness