महापालिकेच्या दवाखान्यांत सुविधांचा अभाव - विजय काळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

पुणे - ""पुणे शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेचे दवाखाने उपलब्ध नसून जे आहेत तेथे सर्व सुविधा मिळत नाहीत. परिणामी, रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाचे ऑडिट व्हावे आणि पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांसाठी पूर्णवेळ स्वतंत्र आरोग्य प्रमुखांची नेमणूक करावी'', अशी मागणी विधिमंडळ अधिवेशनात करणार असल्याचे आमदार विजय काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

सोमवार (ता. 24) पासून अधिवेशन सुरू होत आहे. यात पुण्यासंबंधीचे प्रश्‍न मांडणार असल्याचे काळे यांनी सांगितले. ते म्हणाले, ""महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची दोन-तीन वर्षांत आरोग्य तपासणी झाली नाही. शहरातील साथीच्या रोगांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची यंत्रणा पालिकेने उभारली पाहिजे. कारण, पुणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.'' 

औंध येथे कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करावे, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. या कंपनीला शासकीय दर्जा देऊन करामध्ये सवलत द्यावी, वाहतूक शाखेच्या मुख्यालयासाठी पुणे विद्यापीठासमोर नव्याने प्रशासकीय इमारत बांधावी, या मागण्यांसह खडकी, औंध, बाणेर येथील पाच लाख नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी चतुःशृंगी येथे टाकी बांधावी. तसेच पोलिस बिनतारी संदेश विभागास बाणेर, बालेवाडी, बावधन येथील मोकळी जागा हस्तांतर करावी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या शिक्षण संस्थांवर गुन्हे दाखल करावेत, यासंबंधीचे प्रश्‍नही अधिवेशनात मांडणार असल्याचे काळे यांनी सांगितले. 

ऍग्रो फ्रेंडली वॉक 
कृषी महाविद्यालयाच्या आवारात 29 जुलैपासून "ऍग्रो फ्रेंडली वॉक'हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने कृषी विभागाची माहिती नागरिकांना होईल. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेता येईल. बायोकंट्रोल लॅब, टिश्‍यू कल्चर, मशरूम, बायो फर्टिलायझर, हायटेक हॉर्टी कल्चर, नर्सरी, फळबागा, विविध जाती-प्रजातींची फुले, वृक्षांचीही माहिती येथे देण्यात येईल, असे विजय काळे यांनी सांगितले. 

Web Title: pune news vijay kale mla municipal hostpital