आता तावडेंबाबत तेढ नाही - मोहन जोशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

पुणे - ""सांस्कृतिक कार्यमंत्री हे लेखक-कलावंतांना वेळ देत नाहीत. त्यांना बदला आणि या खात्यासाठी पूर्ण वेळ काम करणारा मंत्री नेमा,' अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यावर जोरदार टीका केलेले अभिनेते मोहन जोशी यांचा विरोध मावळला आहे. तावडे यांच्या भेटीनंतर "आता तेढ राहिले नाही', अशी भूमिका जोशी यांनी जाहीर केल्याने वादावर पडदा पडल्याचे दिसत आहे. 

जोशी यांच्यासह लेखक-कलावंतांनी एकत्र येऊन तावडे यांच्यावर पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली होती. तावडे आम्हाला भेट देत नाहीत. या क्षेत्रातील समस्या समजून घेत नाहीत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या खात्यांचा ताण असेल तर स्वतंत्र सांस्कृतिक कार्यमंत्री नेमा, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवले आहे, असे कलावंतांनी जाहीर केले होते. त्यानंतर तावडे आणि जोशी यांची नुकतीच मुंबईत एकत्रित बैठक झाली. बैठकीनंतर "सकाळ'शी बोलताना जोशी यांनी तावडेंचे कौतुकही केले. 

जोशी म्हणाले, ""तावडे हेसुद्धा माणूसच आहेत. एकावेळी ते किती काम करणार. प्रत्येकाला कामाच्या मर्यादा असतातच; पण त्यांच्याशी झालेल्या भेटीनंतर आता माझ्या मनात तेढ राहिले नाही. त्यांनी आमच्या वेगवेगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. नाट्य परिषदेच्या वेगवेगळ्या कामांसाठी निधीही देणार आहेत.'' 

तावडे म्हणाले, ""जोशी यांनी भेट मागितली आणि मी भेट दिली नाही, असे कधीच घडले नाही; पण आमच्यात सविस्तर चर्चा झाली आहे.'' ज्या मराठी चित्रपटांना सरकारचे अनुदान मिळते, त्यांनी चित्रपटाची एक प्रत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जतन करण्यासाठी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

... म्हणून करमणूक कर सुरू 
""पूर्वी मराठी चित्रपटांसाठी ठराविक रकमेपेक्षा जास्त तिकीट दर घेता येत नव्हते. आता काही निर्माते ही नियमावली नको, असे सांगत आहेत. त्यामुळेच मराठी चित्रपटांना करमणूक कर सुरू झाला. तो "जीएसटी'मुळे सुरू झाला नाही,'' असे तावडे यांनी स्पष्ट केले. "जीएसटी'मुळे नाटकांचे तिकीट दर वाढले आहेत; पण हा विषय केंद्र सरकारच्या अधिकाराखाली येतो. तरीही हा प्रश्‍न सोडविण्यासाठी मी नाट्य निर्मात्यांसोबत बैठक घेतली, असेही ते म्हणाले.

Web Title: pune news vinod tawde mohan joshi