वाघा बॉर्डर ते पुणे सायकल यात्रा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

धायरी - पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आणि सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ‘वाघा बॉर्डर ते पुणे’ असा १९७४ किलोमीटरचा प्रवास करून सायकलस्वार  नुकतेच पुण्यात परतले. त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

धायरी - पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आणि सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ‘वाघा बॉर्डर ते पुणे’ असा १९७४ किलोमीटरचा प्रवास करून सायकलस्वार  नुकतेच पुण्यात परतले. त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

या तरुणांनी गेल्या २६ डिसेंबर रोजी वाघा बॉर्डर येथून सायकलवरून या यात्रेस सुरवात केली होती. त्यानंतर अमृतसर (पंजाब), दिल्ली, पानिपत (हरियाना), जयपूर, उदयपूर (राजस्थान) असा प्रवास करून ते पनवेलमार्गे ७ जानेवारी रोजी रात्री पुण्यात परतले. त्यांचे माणिकबाग चौकात स्वागत करण्यात आले. या वेळी आमदार भीमराव तापकीर, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे, खडकवासला मतदारसंघाच्या भाजप युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन मोरे, नगरसेवक हरिदास चरवड, अभिजित देशमुख  आदी उपस्थित होते.

उर्वी तांबे (वय २१) या तरुणीसह, सचिन बेनकर (वय ३८), युवराज सोनार (३७), मिलनकुमार परदेशी (५२), संदीप रायकर (३९), सचिन खनसे (३९), धनंजय कोंढाळकर (३६) आणि अभिषेक जावळकर (२५) हे या यात्रेत सहभागी झाले होते. हे सर्व जण सिंहगड रस्ता परिसरातील रहिवाशी आहेत.  

तेरा दिवसांचा प्रवास 
पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी या तरुणांनी १३ दिवसांच्या या यात्रेचे आयोजन केले होते. वाघा बॉर्डर ते पुणेदरम्यान येणाऱ्या सर्व गाव आणि शहरात त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती केली. देशात वाढते प्रदूषण लक्षात घेता शक्‍य तेथे नागरिकांनी वाहनांचा वापर न करता सायकलचा वापर करावा, यामुळे पर्यावरणासोबतच आरोग्यदेखील राखले जाते, याबाबत त्यांनी प्रवासात नागरिकांचे प्रबोधन केले.

Web Title: pune news Wagah Border to Pune Cycle Tour