अंथुर्णे येथे पालखीतळावर विविध विकासकामांचे भूमीपूजन

राजकुमार थोरात
शनिवार, 13 जानेवारी 2018

वालचंदनगर (पुणे): अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मुक्काच्या ठिकाणच्या पालखी तळावरील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार दत्तात्रेय भरणे व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आले.       

वालचंदनगर (पुणे): अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मुक्काच्या ठिकाणच्या पालखी तळावरील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार दत्तात्रेय भरणे व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आले.       

लासुर्णे येथे पालखीच्या मुक्कामासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे अंथुर्णे पालखीचा नव्याने मुक्काम सुरु करण्यात आला. गेल्या चार-पाच वर्षापासून संत तुकाराम महाराजांची पालखी येथे मुक्कामी येत आहे. या पालखी तळाच्या सुशोभीकरण व विविध प्रकाराच्या सुविधांसाठी राज्यशासनाकडून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये पालखीतळाच्या २५ एकर मैदानाला संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. पालखी तळावरती अंर्तगत रस्ते करण्यात येणार असून ५ हजार चौरसफुटामध्ये भव्य सभामंडप उभारण्यात येणार आहे. तसेच अद्यावत विश्रामगृहाची निर्मिती करण्यात येणार असून प्रकाशासाठी १३ ठिकाणी मोठे दिवे बसविण्यात येणार आहेत. देहू सारखी भव्य स्वागत कमान बांधण्यात येणार असून ६ टेहाळणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. तसेच वारकऱ्यांना जागेवरती आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी प्राथमिक उपचार केंद्र सुरु करण्यात येणार आहे. पालखी तळावरती ३२० शौचालये उभारण्यात येणार आहेत. या कामांचे भूमीपूजन आमदार भरणे व सभापती माने यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत समिती सदस्या सारिका लोंढे, सरपंच अलका शिंदे, उपसरपंच उज्वला साबळे, सदस्या अनुजा जाधव, तात्याराम शिंदे, आबासाहेब भरणे, युवराज म्हस्के, सुधीर वाघ, बाबा गायकवाड, विजय गायकवाड, भरणेवाडीचे उपसरपंच गुलाब म्हस्के, माजी सरपंच राहुल साबळे, तानाजी शिंदे, दत्तात्रय गायकवाड, विशाल साबळे उपस्थित होते. यावेळी भरणे यांनी सांगितले संत तुकाराम महाराज यांच्या देहू ते पंढरपूर पालखी महामार्गावरील मुक्कामच्या ठिकाणामध्ये अंथुर्णे गावाचा समावेश होतो. या ठिकाणी २५ एकर भव्य पालखी मैदान आहे. या मैदानावरती शुशोभीकरणासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून चांगल्या प्रकाराचे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: pune news walchandnagar bhumi Puja at Anthurne