युद्धकलेचे धडे अन्‌ थरारक कवायती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

पुणे - राष्ट्रीय छात्र सेनेच्या २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिराचा समारोप नुकताच झाला. या शिबिरात सिनिअर आणि ज्युनिअर विंगच्या सुमारे ४५० छात्रांनी सहभाग घेतला होता. युद्धकलेपासून ते थरारक कवायतींच्या प्रशिक्षणापर्यंत प्रत्येक उपक्रमात छात्रांनी सहभाग नोंदवत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

दहा दिवस सेनापती बापट रस्त्यावरील राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुख्य कार्यालयात घेतलेल्या या शिबिरात २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या छात्रा सहभागी झाल्या होत्या. व्याख्याने, चर्चासत्र, कवायतींची प्रात्यक्षिक, सांस्कृतिक कार्यक्रम या शिबिरात आयोजित केली होती. 

ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर सुनील बोधे, डेप्युटी ग्रुप कमांडर कर्नल आर. एल. हणगी, ट्रेनिंग ऑफिसर कर्नल आर. जे. एस. चावला यांनी शिबिराचे संयोजन केले होते. शिबिराला कमांडिंग ऑफिसर ओ. पी. पांडे, डेप्युटी कॅम्प कमांडर कॅप्टन कनकलता चौरे, बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अनुज चनन, ३६ महाराष्ट्र बटालियनचे एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के. एस. दिनसा, ॲडम ऑफिसर मेजर उदयराज सिंग, ९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल वाय. एस. गणेश, ॲडम ऑफिसर कर्नल एस. जे. शर्मा, ३८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अविनाश कोल्हे, लेफ्टनंट कर्नल एस. बंडखडके, ३ महाराष्ट्र आर्म्ड ऑफिसर कमांडिंग कर्नल सौरभ मिश्रा, लेफ्टनंट कर्नल प्रशांत वाघमारे, विंग कमांडर सी. वाय. महाजन आणि कॅप्टन सुरेश कुमार आदी उपस्थित होते.

Web Title: pune news War lessons and tremendous drills