पुणे: चार धरणांत साडेअकरा टक्के पाणीसाठा शिल्लक

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 14 जून 2017

पुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी देखील पडल्या नाहीत.

खडकवासला - पुणे शहर आणि परिसरात सोमवारी मॉन्सून आला. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी धरण क्षेत्रात मात्र तो कोठेही पाऊस झाला नाही. बुधवारी सकाळी चारही धरणांत 3.30 टीएमसी म्हणजे 11.50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

पुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी देखील पडल्या नाहीत. आज दिवसभर बऱ्यापैकी ऊन आणि ढगाळ वातावरण होते. 

सोमवारी मॉन्सून आला होता. तो पाऊस खडकवासला येथे 6, पानशेत 19, वरसगाव22, टेमघर 10 मिलिमीटर पाऊस झाला आहे. एक जूनपासून एकूण पाऊस खडकवासला येथे 14, पानशेत 66, वरसगाव 69 व टेमघर 53 मिलिमीटर एवढा झाला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
बारामतीत पावसाच्या जोरदार सरी
VIDEO: लंडनमध्ये 27 मजली इमारतीला भीषण आग
डास, चिलटांमुळे भूकंप होत नाही - भाजपकडून प्रतिहल्ला
#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'​
दोन मिनिटांनी मोठी निष्ठा टक्‍क्‍यांनीही पुढेच​

अमित शहांच्या दौऱ्यात शक्तीप्रदर्शनासाठी हजार रूपये
सरकार धमक्‍यांना घाबरत नाही - चंद्रकांत पाटील​

Web Title: Pune News water storage in dams