पाणीकपात म्हणजे पुणेकरांची फसवणूक करण्याचे षडयंत्र

Khadakwasla_Dam
Khadakwasla_Dam

हडपसर - खोटी आश्वासने देऊन पुणे महापालिकेत एकहाती सत्ता भाजपने मिळविली असताना, पुण्याच्या पाण्यात तब्बल ६.५० टिएमसी कपात करण्याचा आदेश आणि २४ तास पाणीपुरवठयाच्या निविदेची जाहीरात एकाच दिवशी येणे हा योगायोग नाही. ही सर्व भाजपची बनवाबनवी असून २४ तास पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष व्हावे असा या मागील छुपा अ‍जेंडा असल्याची टिका पालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली आहे. 

पुण्यात पिण्याच्या पाण्याची कपात करायची आणि दुसरीकडे २४ तास पाणीपुरवठा योजनेची निविदा काढायची हा लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. असा आरोप करून तुपे पुढे म्हणाले, पुणे शहराची पाण्याची मागणी वाढत आहे, त्यातच हॉस्टेल, महाविद्यालये, बाजूच्या गावांना पाणी आणि ११ गावे नव्याने समावेश केली आहेत. हॉटेल, औद्योगिक वसाहत व नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता पुरेसे पाणी उपलब्ध नसताना भाजप सत्ताधारी शहराची पाणी कपात करीत आहेत. गल्ली ते दिल्ली भाजप सत्ता आहे, पालकमंत्री गिरीश बापट कालवा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अखत्यारीत बैठका होत असताना पाणी कपात आम्हाला माहीत नाही हा दावा खोटा आहे, जर पालकमंत्र्यांना याबाबत माहीत नसेल तर पुणेकरांचे दुर्देव आहे. हा पूर्वनियोजित कट असून  २४x७ पाणीपुरवठा यात भाजपचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार आहे. निविदेवर सही होत असताना अहवाल बाहेर येतो हा योगायोग नाही हे सर्व पूर्वनियोजित घडवून आणले जाते आहे. भाजपाला सत्तेची नशा चढली आहे, मतदार खिशात आहेत, पुणेकर सोबत आहेत अशा अविर्भावात पुणेकरांच्या भावनेशी खेळण्याचा डाव भाजप करीत आहे.

पाणीकपात भाजप षडयंत्र हाणून पडणार

विरोधी पक्षनेते चेतन तुपे सकाळ शी बोलताना म्हणाले, कोट्यवधींचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पाणीकपात करण्याचे षडयंत्र आम्ही हाणून पाडणारच, गेले वर्षभर सुनावणी सुरू होती तेव्हा भाजपचे मंत्री व सत्ताधारी झोपले होते का ? पालिका हद्दीत सुरळीत पाणीपुरवठा करण्याबरोबर नव्याने सामाविष्ट गावांना पाणी द्यावे. पुणेकरांच्या हिताच्या विरोधात सत्ताधारी गेल्यास त्यांचा दावा उधळून लावू. पाणी कपात होऊ देणार नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com