पाणीपट्टी वसुलीसाठी २२ एप्रिलला लोकअदालत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

पुणे - महापालिकेच्या थकीत पाणीपट्टीचा आकडा वाढत असून, ती वसूल करण्यासाठी आता पुन्हा लोकअदालतीचा पर्याय निवडला आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासनाची बाजू ऐकून ही प्रकरणे मिटविण्यात येणार आहेत. या लोकअदालतीच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांची थकबाकी वसूल होण्याचा अंदाज आहे. २२ एप्रिलला ही लोकअदालत होणार आहे. 
शहरात साधारणत: तीन ते सव्वातीन लाख अधिकृत नळजोडण्या आहेत.

पाणीपट्टीची थकबाकी पाचशे कोटी रुपये इतकी आहे. ती वसूल करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या पातळ्यांवर महापालिका प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून, संबंधितांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तरीही ती भरण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यातच नागरिकांचा पाणीपट्टी चुकीची असल्याचा आक्षेप आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकअदालत घेऊन प्रकारणे निकाली काढण्यात येणार आहेत. लोकअदालतीत सहभागी होणाऱ्या थकबाकीदारांना दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे. या माध्यमातून गेल्या महिन्यात एक कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल झाल्याचे महापालिकेच्या विधी सल्लागार मंजूषा इधाटे यांनी सांगितले.

Web Title: pune news water tax recovery public court