ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पुणे - मकर संक्रांत जवळ येत असतानाच शहरातील थंडीने काढता पाय घेतल्याचे गुरुवारी जाणवले. ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी झाल्याने किमान तापमानाचा पारा 13.5 अंश सेल्सिअस नोंदला गेला. राज्यात सर्वांत कमी तापमान गोंदिया येथे 8.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले असून, शहर आणि परिसरात येत्या बुधवारपर्यंत (ता. 17) थंडी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. 

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. तेथून थंड वारा महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे विदर्भातील थंडी वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. येत्या काही दिवसांपर्यंत राज्यात थंडी कायम राहणार असून, पुढील आठवड्यानंतर कमी होण्यास सुरवात होईल. 

कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मराठवाड्यातील काही भागांतही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित चढ-उतार सुरू आहे. विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या सोमवारपर्यंत (ता. 15) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरात बुधवारपर्यंत (ता. 17) आकाश मुख्यत निरभ्र राहील. 

सध्या हवेतील ओलावा कमी असल्याने कोकणातील किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास पाच अंशांनी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर वगळता उर्वरित कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, नाशिक, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार ते पाच अंशांनी वाढ झाली आहे. विदर्भातील सर्वच शहराचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी घटला.

Web Title: pune news winter weather