स्मशानभूमी नसल्याने करावा लागतोय अंत्यविधी रस्त्यावर 

रवींद्र जगधने
शुक्रवार, 7 जुलै 2017

पिंपरी - हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्कमुळे हिंजवडी व शेजारील गावांचा विकास झाला अशी अनेकांची धारणा आहे. मात्र फेज तीन मधील गवारवाडीला 10 वर्षापासून स्मशानभूमी नाही. स्मशानभूमी रस्त्याच्या कामात गेल्याने अंत्यविधी अक्षरशः रस्त्यावर करावा लागत आहे. 

गवारवाडीतील रहिवासी परमेश्‍वर बाळासाहेब गवारे (वय 33) यांचे शुक्रवारी आजाराने निधन झाले. स्मशानभूमी नसल्याने माणगाव ते टेक महिंद्रा कंपनीच्या मुख्य रस्त्यावर भर पावसात त्यांचा अंत्यविधी करावा लागला. गवारवाडी हे गाव माण ग्रामपंचायतीच्या आधिपत्याखाली येत असून वाडीची लोकसंख्या साधारण पाचशे आहे. तर शेजारीच असलेल्या मेगा पोलिश सोसायटीत सहा हजार व कस्तुरी सोसायटीत तीनशे सदनिका आहेत. मात्र या भागासाठी फेज तीनमध्ये कोठेच स्मशानभूमी नाही. आयटी पार्कमुळे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या मात्र, आत्ता त्यांना अंत्यविधीसाठी जागा नसल्याची खंत गावकरी व्यक्त करत आहेत. या गावातील सामाजिक कार्यकर्ते रोहिदास सावंत हे गेली दहा वर्षापासून स्मशानभूमीसाठी माण ग्रामपंचायत, मुळशी तहसीलदार, प्रांत अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र सरकारी यंत्रणेकडून दखल घेतली जात नसल्याचे सावंत यांनी "सकाळ'ला सांगितले. याबाबत सावंत लवकरच "आपले सरकार' या राज्यशासनाच्या संकेतस्थळावर व पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल करणार आहेत.

Web Title: pune news Without cremation, the funeral should be done on the road