पुणे: सतत भांडत असल्याने पत्नीचा गळा आवळून खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे : पत्नी आई आणि वडीलांना सांभाळत नाही. घरात छोट्या मोठ्या कारणावरुन भांडत असते. याचा राग आल्यामुळे पत्नीचा तिच्या ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना आज (मंगळवार) उघडकीस आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश साईनाथ चव्हाण (वय २३ रा. साईनाथ नगर, गंगानगर परिसर, फुरसुंगी) असे आरोपीचे नाव आहे. त्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. खून केल्यानंतर घराला कुलूप लावले.

आकाशने पत्नीचा खून करण्यापूर्वी आपल्या अडीच वर्षे वयाच्या मुलीला आई-वडिलांच्या घरी सोडले. आरोपी पोलिस ठाण्यात स्वत: हजर झाला. आज पहाटे झोपेत असलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून खात्री केली.

Web Title: Pune news women murder in Hadapsar