येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

सुखदेव मेघराज मेहकारकर (वय 42 रा. नगर ) असे खुन झालेल्या कैद्याचे नाव आहे. त्याचा खुन केल्याच्या आरोपाखाली दिनेश सुरेश दबडे (वय 32 रा. गोरेगांव , मुंबई ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला.

पुणे - येरवडा कारागृहातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा समोर आला आहे. दोन कैद्यांच्या भांडणात एकाचा खुन झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी कारागृहात घडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

सुखदेव मेघराज मेहकारकर (वय 42 रा. नगर ) असे खुन झालेल्या कैद्याचे नाव आहे. त्याचा खुन केल्याच्या आरोपाखाली दिनेश सुरेश दबडे (वय 32 रा. गोरेगांव , मुंबई ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला. सुखदेव हा अपहरणाच्या गुन्ह्यात साडे तीन वर्षाची शिक्षा भोगत होता. तर दिनेश याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप ठोठावली गेली आहे. कारागृहातील स्वंयपाक घरात पाणी सांडल्यावरून या दोघांमध्ये वाद झाले होते. शनिवारी पुन्हा या दोघांमध्ये वाद झाले. यावादात दिनेशने सुखदेव यांना दगड मारला. हा दगड लागल्याने सुखदेव जबर जखमी झाले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. हा प्रकार कारागृहातील "बी 'बराकीमध्ये सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला. हा प्रकार पाहून एका कैद्याने तेथील सुरक्षारक्षक बबन टोके आणि संदीप बोराटे यांना हाक मारली. त्यांनी जखमीला उपचाराकरीता हलविले, परंतु त्यापुर्वी सुखदेव यांचा मृत्यू झाला. 

या प्रकाराची कारागृह प्रशासनाने दखल घेत चौकशी सुरू केली. या दोघांमध्ये गेल्या आठवड्यात वाद झाली होती. याच कारणावरून त्यांच्या पुन्हा वाद झाल्याची माहिती बाळू बनसोडे आणि सचिन गायकवाड या दोन कैद्यांकडून प्रशासनाला मिळाली. दिनेश आणि सुखदेव यांचा कोणत्याही गुन्हेगारी टोळीशी संबंध नाही. दोघांमध्ये झालेल्या भांडणातून हा खुन घडला असुन, येरवडा पोलिस तपास करीत असुन, कारागृह प्रशासनही चौकशी करीत आहे असे अतिरीक्त पोलिस महासंचालक ( कारागृह ) डॉ.भुषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. 

Web Title: pune news yerwada news murder news crime news