पूरग्रस्त भागामधील वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

पूरग्रस्त भागातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाने निधी जमा केला आहे. त्यातून पूरग्रस्त विक्रेत्यांसाठी जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

पुणे -  पूरग्रस्त भागातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाने निधी जमा केला आहे. त्यातून पूरग्रस्त विक्रेत्यांसाठी जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

पूरग्रस्त भागातील दीडशे विक्रेत्यांना सुमारे महिनाभर पुरेल इतका किराणा, १०० चादरी, १५० ब्लॅंकेट, १०० बेडशीट, १०० साड्या, भांड्यांचे पाच सेट यांसह दैनंदिन वापराच्या वस्तूंचा या मदतीत समावेश आहे.

संघाचे अध्यक्ष विजय पारगे म्हणाले, ‘‘राज्यातील कोणत्याही भागातील वृत्तपत्र विक्रेता अडचणीत आल्यास त्यांच्या मदतीसाठी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ नेहमीच अग्रेसर राहील. त्यासाठी आवश्‍यक ती मदत करण्याचा संघाचा प्रयत्न असतो.’’ वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, सचिव अरुण निवंगुणे, विश्वस्त संजय फाटक, महादेव मेमाणे, बजरंग लोहार, यशवंत वादवणे, अमित जाधव, केदार मारणे, राजू जांभूळकर आदी या वेळी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Newspaper Dealers Association has raised funds to help newspaper vendors in flood affected areas

टॅग्स