esakal | Pune : मिळकतकर विभागाच्या नोटिसा
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : मिळकतकर विभागाच्या नोटिसा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ९ हजार नागरिकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी १० मिळकती सील केल्या आहेत. उत्पन्न वाढीसाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असताना, ही कारवाई दोन महिने आधीच सुरू केली आहे.

महापालिकेने यंदा मिळकतकरातून ३ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी सप्टेंबरपर्यंत १ हजार ५१ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झालेले आहेत. ३१ मार्च २०२१ पर्यंत उर्वरित दोन हजार कोटी रुपये मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर गतीने वसूल करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षात मिळकतकराची थकबाकी पाच हजार कोटीपर्यंत गेली आहे. त्यात सुमारे दीड हजार कोटीची थकबाकी मोबाईल टॉवर कंपन्यांची आहे, पण हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेने गेल्यावर्षी अभय योजना राबविली होती. त्यात, सुमारे १ लाख ४४ हजार नागरिकांनी ५०० कोटींची थकबाकी जमा केली होती. यंदा एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत यातील केवळ ५० हजार जणांनी कर भरला आहे, उर्वरित ९४ हजार जणांनी कर भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्याचा फटका महापालिकेला बसला आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात आरोग्यसेवकांच्या चारशे जागांसाठी २५ हजार इच्छुक

अभय योजनेचा लाभ घेतलेल्या पण यंदा कर न भरलेल्या नागरिकांकडून पैसे वसूल करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथक तयार केले आहे. या पथकाने गेल्या महिन्याभरात ९ हजारापेक्षा थकबाकीदारांना नोटीस बजावली आहे. कर न भरणाऱ्या १० मिळकती सील केल्या आहेत.

गेल्या सहा महिन्यांत १ हजार ५१ कोटींचा महसूल मिळकतकरातून मिळवला आहे. थकबाकीदारांनी कर भरावा, यासाठी ९ हजार जणांना नोटीस बजावण्यात आली असून, १० मिळकती सील केल्या आहेत. नागरिकांनी कर भरून महापालिकेला प्रतिसाद द्यावा.

- विलास कानडे,

प्रमुख, मिळकतकर विभाग

loading image
go to top