NSUI - पुणे - मेकॅनिकल इंजिनियरींगच्या ४थ्या वर्षाच्या डायनॅमिक ऑफ मशिनरी या विषयातील चुकीच्या प्रश्नांचे पूर्ण गुण देण्यात यावे आणि कॅम्प्युटर इंजिनियरिंगच्या सॉफ्टवेअर इंजिनियरिंग विषयाच्या अभ्यास क्रमाच्या बाहेरील ७ प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे पुणे शहर अध्यक्ष अभिजित गोरे यांनी दिला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांना दिलेल्या निवेदनात गोरे यांनी विद्यापीठातल्या अनागोंदी कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक मुद्दे कुलगुरू गोसावी यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत.
कुलगुरू गोसावी यांना दिलेल्या निवेदनात, विद्यापीठात अनेक अभ्यासक्रमांचे फोटोकॉपी प्रक्रिया सुरु नसून ती तात्काळ सुरू करावी आणि ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीसाठी अर्ज केला त्यांना देण्यात यावी.
४५ दिवस होऊनही पुनर्मुल्यांकनाचे निकाल अद्याप लागले नाहीत ते निकाल तात्काळ व योग्य पद्धतीने लावावे.ज्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास देऊन आवश्यकता नसताना बॅकलॉगची परिक्षा देण्याची परिस्थिती निर्माण केली अशा विद्यार्थ्यांची रक्कम परत करावी.
मेकॅनिकल इंजिनियरींगच्या ४थ्या वर्षाच्या डायनॅमिक ऑफ मशिनरी या विषयातील चुकीच्या प्रश्नांचे पुर्ण गुण देण्यात यावे आणि कॅम्प्युटर इंजिनियरिंगच्या सॉफ्टवेअर इंजिनियरिंग विषयाच्या अभ्यास क्रमाच्या बाहेरील ७ प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावे.
सर्व अभ्यासक्रमांचे निकाल पुढील ४५ दिवसांच्या आत लावण्याची दक्षता घ्यावी.मागील सर्व घटनाक्रम लक्षात घेता विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराला जबाबदार असणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या भविष्याशीखेळणाऱ्या अकार्यक्षम परिक्षा संचालकांनी तत्काळ राजीनामा द्यावा.अशा मागण्या केल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.