esakal | Pune: ‘ओबीसींची जातनिहाय राष्ट्रीय जनगणना करावी’- ओबीसी महासंघ
sakal

बोलून बातमी शोधा

obc reservation

‘ओबीसींची जातनिहाय राष्ट्रीय जनगणना करावी’- ओबीसी महासंघ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ओबीसींची जातीनिहाय राष्ट्रीय जनगणना करण्यात यावी. तसेच, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दरवर्षी त्याच वर्षात मिळावी. शिवाय नॉन क्रिमीलेअरची मर्यादा २० लाख करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेशची पुणे शहर व जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची सभा नुकतीच झाली. त्यात या मागण्यांबाबत चर्चा झाली. तसेच, राज्य व केंद्र सरकारला राज्यभरातून पोस्टकार्डद्वारे निवेदन देण्याचा निर्णय झाला. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष. डॉ. प्रल्हाद वडगावकर, सरचिटणीस रघुनाथ ढोक, ज्येष्ठ समाजसेवक शरद ताजणे, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अॅड. डॉ. पी. बी. कुंभार, सरचिटणीस सुभाष मुळे आदी उपस्थित होते.

loading image
go to top