पुणे महापालिकेचं अधिकृत ट्विटर अकाऊंट सस्पेंड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

पुणे महानगरपालिकेचं ऑफिशियल ट्विटर अकाऊंट काल गुरुवारी सस्पेंड झालं आहे.

पुणे : पुणे महानगरपालिकेचं ऑफिशियल ट्विटर अकाऊंट काल गुरुवारी सस्पेंड झालं आहे. मात्र, असं घडण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. हे ट्विटर अकाऊंट पुन्हा रिकव्हर करुन सुरु करण्याबाबतची प्रक्रिया सध्या सुरु आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी म्हटलं. पुणे महानगरपालिकेचं ऑफिशियल अकाऊंट @PMCPune या ट्विटर हँडलच्या नावे नोंद आहे. या अकाऊंटला जवळपास 91 हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. हे अकाऊंट 2015 मध्ये सुरु करण्या आले आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जेंव्हा याबाबतची माहिती मिळाली तेंव्हा त्यांनी तातडीने ट्विटर कंपनीशी संपर्क साधून अकाऊंट रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच अकाऊंट अचानकपणे सस्पेंड का झाले, या कारणांचा शोध देखील अधिकाऱ्यांकडून घेण्यात येतो आहे. 

हेही वाचा - ...आता मेट्रो स्टेशनजवळील बांधकामांचा मार्ग झाला मोकळा

काय आहेत ट्विटरचे नियम
लोकांना आपलं म्हणणं कमी शब्दात तातडीने आणि अधिकृतरित्या मांडण्यासाठीचं व्यासपीठ ट्विटर उपलब्ध करुन देतं. हिंसक, छळ करणारे आणि या प्रकारचे भाष्य लोकांना व्यक्त होण्यापासून दूर ढकलतं. तसेच याप्रकारच्या वक्तव्यांनी या चांगल्या व्यासपीठाचा दर्जा घसरतो. प्रत्येकाला मोकळेपणाने सार्वजनिक संवादात सुरक्षितरित्या सहभाग नोंदवता यावा या  दृष्टीनेच ट्विटरचे नियम आखण्यात आले आहेत.

पुढील मुद्यांमुळे अकाऊंट होऊ शकतं सस्पेंड
· Safety (सुरक्षितता)
· Privacy (खाजगीपणा)
· Authenticity (सत्यता)
· Third-party advertising in video content (व्हिडीओमध्ये इतरांची जाहिरात)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Official Twitter account of Pune Municipal Corporation suspended