

Pune ACB Nabs Two Officials in Rs 8 Crore Bribery Case
Esakal
पुण्यात एका सहकारी संस्थेच्या सभासदांकडे शेअर्स सर्टिफिकेट देण्यासाठी आणि जागा विक्रीच्या परवानगीसाठी तब्बल ८ कोटींची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यापैकी ३० लाखांचा पहिला हफ्ता घेताना लिक्विडेटर आणि ऑडिटरला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई करत लिक्विडेटर विनोद देशमुख आणि ऑडिटर भास्कर पोळ यांना अटक केलीय.