...तरच ऑनलाइन शिक्षण होईल शक्य

pune online education needs basic infrastructure
pune online education needs basic infrastructure
Updated on

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, नियमितपणे यंदा 15 जूनला शाळा सुरू होणार नसल्या, तरीही त्यादिवशी ऑनलाईनद्वारे अध्ययन सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, आजही अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनद्वारे शिक्षण घेण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही, परंतु सरकार याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे हा निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी सरकारने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात आधुनिक तंत्रज्ञान किंवा टॅब असेल, यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी होऊ लागली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय चांगला असला, तरीही राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत अद्याप तंत्रज्ञान पोचलेले नाही. शहरी, निमशहरी भागात लॅपटॉप, टॅब, मोबाईल याद्वारे विद्यार्थ्यांना सहज अध्ययन करता येईल. परंतु ग्रामीण तसेच दुर्गम, आदिवासी भागात हे तंत्रज्ञान असेलच, याची शाश्व ती नाही. अशातच नियमितपणे ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यास काही विद्यार्थी शिक्षणाच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्ययता आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सुविधा उपलब्ध असेल, याची खात्री करूनच मग या शिक्षणाला सुरवात करावी, असे मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे. 

विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याची मनविसेची मागणी
'आजही बहुतांश विद्यार्थ्यांकडे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात मोफत टॅब दिला पाहिजे. तरच हा सर्वसमावेशक निर्णय होईल, अन्यथा अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहतील. ग्रामीण आणि शहरी भागातील मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचे पालक सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र सरकार याकडे पुर्णत: दुर्लक्ष करत आहे. राज्यातील एक विद्यार्थी देखील शिक्षणापासून वंचित राहिला, तरी त्याला पुर्णत: राज्य सरकार जबाबदार असेल. विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल,' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com