Pune : पारगाव परिसरात मातीनाला बांध खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोलीकर

Pune : पारगाव परिसरात मातीनाला बांध खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ

पारगाव : पारगाव ता.आंबेगाव येथे आय.टी.सी. मिशन सुनहरा कल तसेच ग्रामपंचायत पारगाव यांच्या संयुक्तपणे गावांमध्ये मृदा व जलसंधारण अंतर्गत अंदाजे तीन लक्ष रुपये खर्च करून मातीनाला बांध खोलीकरणाच्या (गाळ काढण्याच्या ) कामाचा प्रारंभ सरपंच बबनराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आला.

आय.टी.सी. मिशन सुनहरा कल अंतर्गत घोडनदी खोरे प्रकल्प,डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर (नारायणगाव) तसेच ग्रामपंचायत पारगाव यांच्या विद्यमाने गावांमध्ये मृदा व जलसंधारण अंतर्गत मातीनाला बांध खोलीकरणाच्या (गाळ काढण्याच्या ) कामाची सुरुवात करण्यात आली

याप्रसंगी माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, प्रकल्प अधिकारी सूरज गुप्ता, कृषी सहाययक किरण सोंडकर, इंजिनिअर रमेश बारगजे, सतेज दातखिळे, चंद्रकांत शिरोळे, गणेश बोऱ्हाडे, खंडू बोऱ्हाडे, श्रीहरी बोऱ्हाडे आदी ग्रामस्थ उपस्थित मातीनाला बांध खोलीकरणाच्या कामामुळे परीसरात "पाणी आडवा पाणी जिरवा

"अंतर्गत माती नाला,ओढा खोलीकरण कामे चालू असून नाल्यांतील मातीचा शेतात टाकण्यासाठी उपयोग होणार आहे सेच पावसाचे पाणी जमिनीत जिरवल्यामुळे जमिनीतील पाणी पातळीत वाढ होणार आहे असे

विठ्ठल ढोबळे यांनी सांगितले.