पुण्यात लक्ष्मी रोडवरचं पार्किंग पुन्हा फुल्ल; वाचा सविस्तर बातमी!

In Pune Parking is full again but customer are less in the shop
In Pune Parking is full again but customer are less in the shop

पुणे : पार्किंग फूल, पण दुकानात जेमतेमच गर्दी... असे काहीसे चित्र बुधवारी शहरातील बाजारपेठेत पाहावयास मिळाले. पी 1 पी 2 चा रद्द झाल्यानंतर सर्व दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र पहिल्याच दिवस ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे अनेक दुकानदारांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन महिन्यांचा लॉकडाऊन उठल्यानंतर जून महिन्यात महापालिका आणि राज्य सरकारने दुकानदारांना पी 1 - पी 2 या पद्धतीने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे काही प्रमाणात व्यापाराची घडी सुरळीत होऊ लागली नाही, तोच जुलै महिन्यात पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी घडी पुन्हा विस्कळित झाली होती. 23 जुलै नंतर पी 1पी 2 पद्धतीने दुकाने उघडण्यास व्यापाऱ्यांचा विरोध होता. त्यावर पुणे व्यापारी महासंघाकडून प्रशासनाला काही पर्याय देखील देण्यात आले होते. परंतु महापालिका प्रशासन राज्य सरकारकडे बोट दाखवत त्यावर निर्णय घेत नव्हते. अखेर व्यापाऱ्यांच्या मागणीला यश आले आणि आजपासून पुण्यातील सर्व दुकाने उघडण्यास महापालिकेकडून परवानगी देण्याचे आदेश काढण्यात आले. 

 पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'

त्यानुसार आज पहिल्या दिवशी लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, रविवार पेठ, बोहरी आळीसह शहराच्या सर्व परिसरातील दुकाने उघडी झाली. नेहमीप्रमाणे दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे रस्त्यावरील पार्किंगही फूल झाली. परंतु जेमतेम व्यवसाय झाला असल्याचे अनेक दुकानदारांनी सांगितले. परंतु रविवार पेठ, बोहरी आळी, नाना, भवानी पेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते. सणासुदीचा काळ आहे. अशा काळात महापालिकेने हा निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली, याबद्दल प्रशासनाचेही अनेकांनी आभार मानले. पी 1 पी 2 मुळे ग्राहकांचा गोंधळ होत होता. तो आता होणार नाही, असेही काही व्यापारी म्हणाले. 

''पी 1 पी 2 च्या 140 दिवसांच्या कालावधीत केवळ 40 दिवसच दुकान उघडण्यास परवानगी मिळाली होती. आजपासून मात्र दुकाने आता नियमितपणे सुरू झाली. इतक्‍या दिवस बाजार पेठेला छावणीचे स्वरूप होते. आता बाजारपेठ पूर्वीप्रमाणे दिसायला लागली.''
- बी. एन अष्टेकर (सराफ व्यावसायिक) 

पुणे महापालिकेने पाणी कपातीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!

''पी 1 पी 2मुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. विशेषतः: परगावावरून येणाऱ्या ग्राहकांना अनेकदा परत येऊन जावे लागत होते. आज मात्र सर्व दुकाने उघडल्याने पहिल्याच दिवशी ग्राहकाही चांगले राहिले.''
- वसंत कवाड (खेळणीचे व्यापारी) 
 

''पी 1 पी -2 मुळे नक्की कोणते दुकाने सुरू आहे, हे ग्राहकांना कळत नव्हते. व्यवसायाचे देखील नुकसान होत होते. त्यामुळे ग्राहकांना परत यावे लागत होते. परिणामी दुकानात गर्दी देखील होत होती.''
- नितीन पंडित (कपड्याचे व्यापारी)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com