Pune Subway Issues : भुयारी पादचारी मार्गात कुठे अंधार, कुठे तळीरामांचे अड्डे; पुणे शहरासह उपनगरांत दयनीय अवस्था, महापालिकेचे दुर्लक्ष

c : पुणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले कर्वेनगर, विमाननगर आणि जंगली महाराज रस्त्यावरील अनेक पादचारी भुयारी मार्ग कचरा, पाणी, अंधार आणि गैरसोयींमुळे दुरवस्थेत असून, नागरिकांची सुरक्षा धोक्यात आल्याने महापालिका प्रशासनाच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Pune Subway Reality - Neglect and Danger

Pune Subway Reality - Neglect and Danger

Sakal

Updated on

पुणे : शहरातील मोठे रस्ते, चौक सुरक्षितपणे पादचाऱ्यांनी ओलांडावेत, म्हणून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पादचारी भुयारी मार्ग बांधले. पण या भुयारी पादचारी मार्गांची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित केली जात नाही. भुयारी मार्गात पडलेला कचरा, अपुऱ्या प्रकाशामुळे अंधार, तेथे असणारे तळीरामांचे अड्डे यामुळे सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. काही भुयारी मार्ग तर वर्षानुवर्षे बंद असून, त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे पुणे महापालिका प्रशासन कधी लक्ष देणार? असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत. पुणे शहरासह उपनगरांतील भुयारी पादचारी मार्गांची ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी पाहणी केली. यातून भयाण वास्तव समोर आले आहे.

Pune Subway Reality - Neglect and Danger
Solapur Crime: 'पानगावात घरफोडी; ४ लाखांचा ऐवज लंपास', कुटुंबीय घराला कुलूप लावून शेतामध्ये चाेरट्यांनी डाव साधला..
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com