पुणे : कृषीपंप व केबलची चोरी करणारी पिकअप गॅंग जेरबंद

८ लाख ६८ हजार रुपयांचा मुदेमाल जप्त
अटक केलेले आरोपी, मुद्देमलासह तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी
अटक केलेले आरोपी, मुद्देमलासह तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारीsakal

नारायणगाव : जुन्नर,आंबेगाव तालुक्यात कृषीपंप व केबलची चोरी करून कष्टकरी शेतकऱ्यांना जेरीस आणणाऱ्या सात जणांच्या पिकअप गॅंग टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चार जणांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.आरोपीकडून तीन वाहने, आठ कृषीपंप व केबल असा ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुदेमाल जप्त केला आहे. ही कारवाई पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस पथकाने केली आहे.आशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी साई उर्फ भूषण संदीप पवार (वय २२, राहणार पाटे- खैरेमळा नारायणगाव) , शुभम सुभाष तोत्रे( वय १८ राहणार मंचर ता. आंबेगाव) , विकी संतोष लोखंडे( वय २० राहणार वैदवाडी, नारायणगाव ),ओतूर येथील भंगार व्यावसायिक गुफरान शेख यांनाअटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

या बाबत माहिती अशी: मागील एक वर्षा पासून नारायणगाव, येडगाव भागांत कृषीपंप व केबल चोरीच्या घटना वाढल्या होत्या.कृषीपंप व केबलची चोरी झाल्या नंतर पिके वाचवण्यासाठी शेतकरी पुन्हा नवीन कृषीपंप व केबल खरेदी करत असत.त्या नंतर काही दिवसांत पुन्हा चोरी होत असे.या मुळे शेतकरी त्रस्त झाले होते. या बाबतची तक्रार शेतकऱ्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या टोळीचा छडा लावण्याचे आदेश गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले होते.मार्च महिन्यात नारायणगाव परिसरातील डेरेमळा व खेबडेमळा येथील ईश्वर दिलीप डेरे,दिनकर फत्तेसिंग खेबडे व अन्य चार शेतकऱ्यांनी डिंभे कालवा, मीना नदी पत्रात शेती सिंचनासाठी बसवलेले सहा कृषीपंप चोरीला गेले होते. या बाबतची तक्रार शेतकऱ्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली होती.

मागील दोन वर्षे शेतकरी अडचणीत आहेत. घेतलेले पिक कर्ज कसे मार्च अखेर कसे भरायचे या चिंतेत शेतकरी असताना मार्च महिन्यातच कृषीपंप चोरीला गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला होता. सततच्या कृषीपंप व केबल चोरीमूळे शेतकरी खचले होते. या सराईत टोळीचा छडा लावण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सी.सी.टी.व्ही कॅमेरे, गोपनीय बातमीदार याचे मार्फत माहिती घेऊन रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या वाहनांचा शोध घेतला.

दरम्यान शुभम तोत्रे, भूषण पवार हे कृषीपंपाची विक्री करतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. नारायणगाव बसस्थानका जवळ कृषीपंप विक्रीसाठी आले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुभम तोत्रे, भूषण पवार यांना अटक केली. पुढील तपासात त्यांनी टोळीतील इतर पाच आरोपींची

माहिती पोलिसांना दिली. आरोपीकडे एक पिकअप व दोन मोटारी अशी तीन वाहने होती. या वाहनांचा वापर करून आरोपी मध्यरात्रीच्या सुमारास कृषीपंप व केबलची चोरी करत असे.चोरी केलेले कृषीपंप व केबल कुकडी वसाहतीमधील खोलीत ठेवत. त्या नंतर गिऱ्हाईक पाहून विक्री करत.प्राथमिक चौकशीत आरोपींनी सात गुन्ह्यांची कबुली दिली आहे.ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पृथ्वीराज ताटे,हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, राजू मोमीन, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, दिनेश साबळे, सचिन कोबल , मुकुंद कदम, दगडू वीरकर, पोलिस मित्र प्रसाद पिंगळे, आकाश खंडे यांच्या पथकाने केली. तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

फोटो ओळ :

नारायणगाव( ता.जुन्नर): अटक केलेले आरोपी, मुद्देमलासह तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com