बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे रूप पालटणार 

दीपेश सुराणा
मंगळवार, 27 मार्च 2018

पिंपरी - चिंचवड-संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयामध्ये काळानुरूप विविध बदल केले जाणार आहेत. प्राणी आणि पक्ष्यांचा येथील वावर अनुकूल व्हावा, यासाठी नैसर्गिक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय भविष्यात पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. 

दृष्टिक्षेपात प्राणिसंग्रहालय : 

पिंपरी - चिंचवड-संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयामध्ये काळानुरूप विविध बदल केले जाणार आहेत. प्राणी आणि पक्ष्यांचा येथील वावर अनुकूल व्हावा, यासाठी नैसर्गिक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय भविष्यात पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. 

दृष्टिक्षेपात प्राणिसंग्रहालय : 

 • प्राणिसंग्रहालय नूतनीकरणाला 2016 मध्ये सुरवात 
 • अपेक्षित खर्च : 14 कोटी 
 • काम कधी होईल पूर्ण? : सप्टेंबर 2018 पूर्वी. 
 • विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने डिसेंबर 2017 पासून प्राणिसंग्रहालय बंद 
 • प्राणिसंग्रहालयाच्या बृहत विकास आराखड्याला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी 

वैशिष्ट्ये : 

 • प्रत्येक प्राण्यांच्या आवश्‍यकतेनुसार उभारणार ठराविक आकारमानाचे पिंजरे 
 • प्राण्यांना आवश्‍यक सेवा-सुविधा देण्यासाठी राहणार प्राधान्य 
 • "सर्पोद्यान व पक्षालय' या संकल्पनेवर आधारित असेल रचना 

काय होणार सुधारणा : 

 • प्राण्यांसाठी असणार अद्ययावत रुग्णालय (आठशे ते नऊशे चौरस मीटर) 
 • प्राणिसंग्रहालयाच्या मध्यभागी असेल माहिती केंद्र 
 • वन्यजीवविषयक ग्रंथालय उभारणार 
 • लहान मुलांना वन्यजीव संकल्पना समजावी, अशा खेळांचे नियोजन 
 • सदाहरित वनाच्या संकल्पनेवर आधारित लॅन्डस्केपींग 
 • वन्यजीव शैक्षणिक केंद्राची सुविधा; 2 ऍम्फी थिएटर 

सध्या असलेले प्राणी व पक्षी : 

 • पाणथळी पक्षी : बदक 
 • मगर - 6 
 • पश्‍चिम घाटातील सर्प : 13 प्रकारचे साप. 

नवीन येणारे प्राणी व पक्षी :

 • प्राणी : सुसर 
 • पाणथळी पक्षी : हंस, सारस क्रौंच, शेराटी, चित्रबलाक असे एकूण 13 प्रकारचे पक्षी 
 • 9 प्रकारचे साप, अजगर (दोन प्रकारचे), किंग कोब्रा, ऍनाकोंडा आणण्यासाठी प्रयत्न 
 • सरडा - ग्रीन इग्वाना (साडेपाच ते सहा फूट), 3 प्रकारचे सरडे 

संबंधित प्राणिसंग्रहालयात आवश्‍यक सुधारणा झाल्यानंतर ते राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण असे प्राणिसंग्रहालय होईल. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्राणिसंग्रहालयाची स्वत: पाहणी करून काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हे काम सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. 
- संजय कांबळे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका. 

निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयात विविध सुधारणा करून त्याचा कायापालट केला जाणार आहे. त्यासाठी सध्या प्राणिसंग्रहालय बंद ठेवले आहे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर ते नागरिकांसाठी खुले केले जाईल. 
- दीपक सावंत, अभिरक्षक, निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय. 

Web Title: pune pimpri bahinabai chaudhari zoo