

Pune Pimpri Chinchwad Rickshaw Fare Hike Starts September 1 RTO Issues New Tariff Rules for Passengers
sakal
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रादेशिक परिवहन समितीने रिक्षा दरवाढीला मंजुरी दिली असून, १ सप्टेंबरपासून नवीन दर लागू होणार आहेत. नवीन दरानुसार मीटरचे ‘कॅलिब्रेशन’ (अपडेट) करण्यासाठी रिक्षाचालकांना ६ महिन्यांची (२७ फेब्रुवारीपर्यंत) मुदत दिली आहे. या काळात जुन्या मीटर रीडिंगवरून वाद होऊ नयेत, यासाठी ‘आरटीओ’कडून रिक्षाचालकांना अधिकृत ‘टेरिफ कार्ड’ दिले जाणार आहे. जोपर्यंत मीटर अपडेट होत नाही, तोपर्यंत मीटर जुनेच दर दाखवतील. मात्र, प्रवाशांनी ‘टेरिफ कार्ड’मधील दरानुसारच सुधारित भाडे देणे अनिवार्य असणार आहे.