Pune Rain Today : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस; कोथरूड, बाणेर, हिंजवडीत पावसाचा जोर

Pune Weather Update : सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून सकाळी ६.३० वाजल्यापासून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हवामान मॉडेल्सनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा नक्कीच जास्त पाऊस पडत आहे.
Pune Weather Forecast and IMD Alert

Pune Weather Forecast and IMD Alert

esakal

Updated on: 

Pune Rain Today Latest Weather Update : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात रविवार रात्रीपासून संततधार पाऊस पडत असून सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुण्यातील अनेक भागांत तसेच पिंपरी-चिंचवडच्या अनेक उपनगरात सकाळी ६.३० वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे सकाळी कामावार निघालेल्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...