

CM Devendra Fadnavis Declares ‘Self-Strength’ Strategy
Sakal
पुणे : महापालिका निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढणार का ? याबाबत पुण्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे थेट उत्तर दिले. "पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष समोरासमोर लढेल. भाजपने मागील ५ वर्षात पुण्यात चांगले काम केले आहे. त्यामुळे दोन्ही मोठे पक्ष वेगळे लढतील, फक्त ही लढत मैत्रीपूर्ण असेल.' असे स्पष्ट करत फडणवीस यांनी भाजपसाठी "स्वबळा'चा नारा दिला.