प्रवाशांनो निश्चिंत व्हा! पुणे पिंपरी चिंचवड वाहतूक सुरळीत

पांडुरंग सरोदे
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना जोडणारे औंध परिसरातील जुना सांगवी पुल, औंध गावातील राजीव गांधी पुल व डीमार्ट जवळील महादजी शिंदे पुल हे तिन्ही पुल आज सकाळपासून पूर्ववत सुरु करण्यात आले आहेत.

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना जोडणारे औंध परिसरातील जुना सांगवी पुल, औंध गावातील राजीव गांधी पुल व डीमार्ट जवळील महादजी शिंदे पुल हे तिन्ही पुल आज सकाळपासून पूर्ववत सुरु करण्यात आले आहेत.

पाणी वाढल्यास सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून कालपासून बंद ठेवण्यात आले होते. तसेच औंध व अन्य पुलांजवळ वाहतुक पोलिस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत. परंतू आज वाहतूक सुरळीत झाली आहे.

शाळा - महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे पुणे शहरातील रस्त्यांवरील गर्दी सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमी झाल्याचे दिसून आले.पावसानेही पहाटे सहा वाजल्यापासून जोर कायम धरल्यामुळे पुणेकरांनी घरातच बसणं पसंत केल्याचे दिसत आहे. फक्त नोकरदार घराबाहेर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे पीएमपीच्या बसला देखील गर्दी कमी आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Pimpri Chinchwad transportation now possible