

Despite the Maharashtra government's decision to increase the Pink E-Auto subsidy to 40%, only 17 women have started operations in Pune over the last two years, highlighting implementation challenges.
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : राज्य सरकारने महिलांसाठीच्या ‘पिंक ई-ऑटो’ योजनेतील अनुदान २० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढविले असले, तरी पुण्यात या योजनेची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे. जिल्ह्यासाठी सुमारे चार हजार ‘पिंक ई-ऑटो’चे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र, योजना सुरू होऊन दोन वर्षे उलटूनही केवळ १७ महिलांनीच अर्ज प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे योजनेच्या उद्दिष्टांमध्ये आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे.