

Scam in PMC Parking Lots Exposed
Sakal
पुणे : महापालिकेच्या नारायण पेठ, मंडई, पुणे रेल्वे स्थानक येथील वाहनतळांसह अन्य वाहनतळांवर अनेक वर्षांपासून ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची लुबाडणूक होते. मात्र ठेकेदारांवर कधीही ठोस, परिणामकारक कारवाई झाली नसल्याने ते महापालिकेस जुमानत नाहीत. म्हणूनच संबंधित ठेकेदारांचे ठेके रद्द करून नवीन ठेकेदारांना कायम जरब बसेल, अशी व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.