

PMC's Unused Purchases Scandal
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या भांडार विभागाकडून नऊ वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे कापड, साड्या खरेदी केल्या. पण हे साहित्य वाटप न करता गोदामात ठेवून देण्यात आले. दोन वर्षांपूर्वी घनकचरा विभागासाठी इकोचिप पावडर खरेदी केली. तीदेखील विनावापर पडून आहे. यात महापालिकेचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण ठेकेदारांचे बिलही वेळेवर दिले आहे. यात गैरव्यवहार झाला असून, याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे.