

CIRTs Role in Bus Safety Check
Sakal
पुणे : पीएमपी प्रशासनाने बसला आग लागण्याच्या पार्श्वभूमीवर ताफ्यातील सर्व बसेसचे ‘फायर ऑडिट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेकडे (सीआयआरटी) याची जबाबदारी सोपविली आहे. येत्या १५ दिवसांत तपासणीला सुरुवात होईल. त्या वेळी बसमधील अग्निशामक आणि आग प्रतिबंधक प्रणाली (एफडीएसएस) कार्यरत आहे की नाही, याचीदेखील तपासणी होईल. हे करीत असतानाच बसचालकांना व वाहकांना अग्निशामक यंत्र कसे हाताळायचे, याबद्दलदेखील प्रशिक्षण दिले जाणार आहे.