Pune : बेकायदा दारू विक्रेत्याने बंद केला कायमचा व्यवसाय, मंचर पोलिसांकडून सन्मान

मंचर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे यांच्या हस्ते गजानन पोखरकर याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
pune
pune sakal

मंचर : पिंपळगाव-खडकी (ता.आंबेगाव) परिसरात गेल्या अनेक वर्षापासून लपूनछपून झाडाझुडुपात बेकायदा दारू विक्री करणाऱ्या विक्रत्याचे समोपदेशन मंचर पोलिसांनी केले.त्याचा सकारात्मक परिणाम झाला. “यापुढे दारूची विक्री करणार नाही.” अशी शपथ गजानन आबाची पोखरकर (वय ४२) यांनी मंचर पोलीस ठाण्यात घेतली.त्यांच्यामध्ये झालेला अमुलाग्र बदल पाहून पोलीसही भारावून गेले. मंचर पोलिसांनी त्याबद्दल पोखरकर यांचा पोलीस ठाण्यात शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

पिंपळगाव परिसरात गजानन पोखरकर अवैधरित्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या विक्री करत होता. याबाबत मंचर पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जात होती. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर व सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे यांनी पोखरकरला पोलीस ठाण्यात बोलावले. वारंवार चर्चा केली. त्यांचे मतपरिवर्तन करण्यात त्यांना यश आले.

“गजानन पोखरकरने अवैध दारू विक्रीचा व्यवसाय पूर्णपणे बंद केला आहे. त्याच्या जवळ असलेल्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांचे त्याने विसर्जन केले. यापुढे दारू विक्री करणार नाही. अशी शपथ त्याने घेतली आहे. त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आहे. आत्ता तो शेती व्यवसायाकडे वळला आहे.”

बालाजी कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंचर पोलीस ठाणे (ता.आंबेगाव).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com