esakal | चिकन-अंडी खाल्ल्याने होतो कोरोना; व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला ठोकल्या बेड्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Chicken_Coronavirus

आंध्र प्रदेश येथून एका युट्यूब चॅनलवरही असा व्हिडीओ अपलोड झाला होता. त्याचा शोध घेऊन मोहम्मद अब्दुल सत्तार यास अटक केली.

चिकन-अंडी खाल्ल्याने होतो कोरोना; व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला ठोकल्या बेड्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : चिकन, मटण, अंडी खाल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होतो, असे खोटे व्हिडिओ बनवून ते समाजमाध्यमांवर प्रसारीत करुन राज्यातील पोल्ट्री व्यावसायाचे हजारो कोटीचे नुकसान करण्यात आले होते. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन सायबर पोलिसांनी असे व्हिडिओ बनवून ते व्हायरल करणाऱ्यास आंध्र प्रदेशातून अटक करण्यात आली, तर उत्तर प्रदेशातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मोहम्मद अब्दुल सत्तार (रा. शहासेब, गोदावरी ईस्ट, काकिनाडा, आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तसेच एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तसेच पुन्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच प्रत्येकाच्या मोबाईलवर चिकन, अंडी खाऊ नका, तुम्हाला कोरोनाचा आजार होईल, असे व्हिडिओ, मेसेज तयार करुन ते सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून व्हायरल केले जात होते.

- कोरेगाव भीमा : नवलखा, तेलतुंबडे यांच्या अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टाचे आदेश

या प्रकारामुळे राज्यासह देशातील पोल्ट्री उद्योजकांचे अक्षरश: कंबरडे मोडले. उद्योजक, व्यावसायिकांना हजारो कोटी रुपयाचा फटका बसला होता. 

दरम्यान, या प्रकरणाची औंध येथील राज्य पशुसंवर्धन विभागाने पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचा शोध घेतला. त्याने एका महिलेच्या मोबाइलचा वापर करुन युट्यूब चॅनेलवर ही माहिती अपलोड केली होती. 

- निर्भया प्रकरण : दोषी मुकेशची 'ही' शेवटची चालही अपयशी; फाशी होणारच!

आंध्र प्रदेश येथून एका युट्यूब चॅनलवरही असा व्हिडीओ अपलोड झाला होता. त्याचा शोध घेऊन मोहम्मद अब्दुल सत्तार यास अटक केली.