esakal | निर्भया प्रकरण : दोषी मुकेशची 'ही' शेवटची चालही अपयशी; फाशी होणारच!
sakal

बोलून बातमी शोधा

Nirbhaya-Mukesh-Singh

या गुन्ह्यातील सर्व दोषींना येत्या २० मार्चला सकाळी ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे.

निर्भया प्रकरण : दोषी मुकेशची 'ही' शेवटची चालही अपयशी; फाशी होणारच!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेशची शेवटची चालही अपयशी ठरली. यानंतर दया याचिका आणि क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची परवानगी मिळणार नसल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. अरुण मिश्रा आणि न्या. एम. आर. शाह यांनी मुकेशची याचिका फेटाळून लावली. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुकेशची या पूर्वीची वकील वृंदा ग्रोवर यांनी क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मुकेशने केला होता. तसेच पुन्हा एकदा दया याचिका आणि क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्याची ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील सर्व दोषींना येत्या २० मार्चला सकाळी ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. 

- Coronavirus : भारत लॉकडाऊनमध्ये जाईल? जाणून घ्या सत्य!

तसेच दोषींनी आपल्या सर्व पर्यायांचा वापर केला असून त्याची मर्यादा संपल्याचेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. आता त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर पर्याय शिल्लक राहिलेला नाही, असे नमूद केले. 

- 'KGF Chapter 2'ची रिलीज डेट ठरली; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

दोषी मुकेशने आता एम. एल. शर्मा यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, याचिका दाखल केल्यापासून तीन वर्षांपर्यंत क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा अधिकार याचिकाकर्त्याला असतो. त्यामुळे माझ्याकडे अजून वेळ शिल्लक आहे, असे दोषी मुकेशने म्हटले आहे. दरम्यान, मुकेशची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने जुलै २०१८ मध्ये फेटाळून लावली होती.

- तुरुंगातील 60 हजार कैद्यांची 'कोरोना' तपासणी

loading image