सीरमच्या आगीचा पंचनामा दुसऱ्या दिवशीही सुरुच; अहवालाबाबत अपडेट आले समोर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

सीरम इन्स्टिट्युटमधील आगीच्या घटनेचा सलग दुसऱ्या दिवशी हडपसर पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. संबंधीत घटना मोठी असल्याने पंचनाम्यासाठी आणखी एक दिवस लागण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

पुणे - सीरम इन्स्टिट्युटमधील आगीच्या घटनेचा सलग दुसऱ्या दिवशी हडपसर पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. संबंधीत घटना मोठी असल्याने पंचनाम्यासाठी आणखी एक दिवस लागण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सविविध विभागांचा संयुक्त अहवाल आल्यानंतरच आगीचे कारण कळू शकणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी येथील "एम-एसईझेड-3 ' या प्रकल्पातील एका इमारतीला आग लागून त्यामध्ये पाच जणांचा मृत्यु झाल्याची घटना गुरूवारी घडली होती. या घटनेनंतर हडपसर पोलिसांकडून शुक्रवारपासून घटनास्थळाच्या ठिकाणी पंचनामा करण्यास सुरूवात करण्यात आली. दुसऱ्या दिवशीही पंचनामा करण्याचे काम सुरु होते. पाच पोलिस अधिकारी व पाच पोलिस कर्मचारी असे एकूण दहा पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. घटना मोठी असल्याने पोलिसांच्या पंचनाम्यासाठी आणखी एक दिवस लागण्याची शक्‍यता हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी व्यक्त केली. 

पुण्यात कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भीषण आग; मशिनरी जळून खाक

दरम्यान, या आगीच्या घटनेची पुणे अग्निशामक दल, पीएमआरडीए, एमआयडीसी अग्निशामक दल तसेच न्यायवैद्यकय विभाग, विद्युत विभाग यांच्यातर्फे शुक्रवारी पाहणी करण्यात आली. या सर्व विभागांच्या पाहणीमध्ये आग दुसऱ्या मजल्यावर लागल्याचे निष्पन्न झाले, मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. न्यायवैद्यक व विद्युत विभागाकडून येणाऱ्या माहितीचा समावेश संबंधीत अहवालामध्ये झाल्यानंतरच संयुक्त अहवाल पुढे येईल. त्या अहवालामध्येच आगीचे कारण स्पष्ट होईल, त्यासाठी आणखी कालावधी लागण्याची शक्‍यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पुण्यात पुन्हा होणार एल्गार परिषद

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum institute police investigation report may delay more days